उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. 4 जानेवारी रोजी ‘डीआरएक्स कट्टा’ आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा-लोहारा मतदार संघांचे आमदार प्रवीण स्वामी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. एक सामान्य शिक्षक ते विधानसभा आमदार प्रवास याबद्दल त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. बालपण बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये गेले. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या 21 व्या वर्षी नोकरी लागली. एक शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे एकच उद्दिष्ट समोर होते. शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी खूप काळ भेटला याबद्दल मी नशीबवान आहे. समाजाची, देशाची सेवा करण्यासाठी मला आमदार म्हणून संधी आपल्या तालुक्यातील जनतेने दिली. याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. पुढील येणाऱ्या काळात मी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असेन. तालुक्याचा शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकास मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यामध्ये नवीन उद्योग उभारणी, रोजगार निर्मिती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांचा विकास करणे, तळागाळातील सर्व जनतेला न्याय देण्याच्या दुष्टीने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवन प्रवास करत असताना सर्व संकटाना सामोरी जाऊन आपले जीवनाचे उद्दिष्ट गाठावे, थोरा-मोठ्यांचा आदर करावा. देशाची सेवा करण्यासाठी सतत तत्पर असावे.अभ्यासाबरोबरच वक्तृत्व, नृत्य, चित्रकला, गायन, संगीत इत्यादी कलागुण विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावेत असे त्यांनी प्रतिपादन केले. संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे यांनी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात विशेष लक्ष देण्याबद्दल मत व्यक्त केले. यावेळी प्रा.किरण पांचाळ, प्रा.परीक्षित शिरूरे, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.अंकिता यादव, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.प्राजक्ता ननवरे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य महेश कदारे व सूत्रसंचालन व आभार प्रा.अंकिता वडजे यांनी मानले.