उमरगा:- उमरगा तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी अंबादास जाधव यांची उपाध्यक्षपदी विकास गायकवाड , महेबुब पठाण तर सचिवपदी प्रदिप भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली . शनिवारी दि.४ रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत सन २०२५ – २६ वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.त्यात तालुकाध्यक्षपदी अंबादास जाधव यांची , उपाध्यक्षपदी विकास गायकवाड व महेबुब पठाण यांची तर सचिवपदी प्रदिप भोसले यांची निवड करण्यात आली .यावेळी खालील प्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली . कार्याध्यक्ष – देवसिंग राजपूत , सहसचिवपदी – विश्वास सोनकांबळे , कोषाध्यक्ष – महादेव पाटिल , संघटक – आकाश पोतदार , सहकोषाध्यक्ष – जाफर जमादार , मुख्यसल्लागार – गुणवंत जाधवर , सुभाष जेवळे , प्रसिद्धीप्रमुख – मोहन जाधव तर कार्यकारिणी सदस्य म्हणून आदिनाथ भालेराव,
शंकर बिराजदार , लक्ष्मण पवार , उमेश सूर्यवंशी , अमोल गायकवाड , विशाल देशमुख , अनिकेत औरादे , शिवराज पाटिल , हणमंत शंके , सुरज आबाचणे , आनंद बागल , अमोल सुरवसे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी या बैठकीत आगामी काळात पत्रकारासाठी कार्यशाळा , रक्तदान शिबिर , पत्रकारासाठी पुरस्कार आधी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला .