धाराशिव :- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग धाराशिव अतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्या होत्या. यात उमरगा नगरपरिषद चे कर्मचारी ईरफान शेख यांनी गोळा फेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर सोलो डान्स स्पर्धेत व्यंकट क्षीरसागर यांनी प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. एकाच कार्यालयातील दोन कर्मचारी यांची स्पर्धेच्या वेगळ्याप्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली ही बाब अभिनंदनीय असून या यशाबद्दल नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन करून कौतुक केले उमरगा नगरपरिषद कार्यालयात यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडासंकुल येथे 2 व 3,4 जानेवारी 2025 रोजी पार पडलेल्या क्रीडा स्पर्धा क्रिकेट, हॉलीबॉल 100 मीटर,धावणे 300 मीटर चालणे, बॅडमिंटन,कॅरम, बुद्धिबळ, व गोळा फेक, शटल कॉक, इत्यादी व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये वैयक्तिक डान्स, ग्रुप डान्स ,वैयक्तिक गायन ,ग्रुप गायन, कविता वाचन ,रांगोळी ,चारोळी वेशभूषा, रांगोळी, इत्यादीचा समावेश केला होता.पुढील विभागीय स्पर्धा संभाजीनगर येथे होणार आहेत.