उमरगा नगर परिषद चे तुळशीदास वराडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ संपन्न

0
52

उमरगा: येथिल नगर परिषद कार्यालयात मागील 34 वर्षांपासून  सेवेत कार्यरत असलेले कार्यालयीन अधीक्षक तुळशीदास  वराडे दि. 31/12/24 रोजी सेवानिवृत्ती झाल्यानिमित्त दि. 13/01/25 रोजी नगरपरिषद कार्यालयाच्यावतीने सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात  आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विक्रम म्हस्के होते. तुळशीदास वराडे हे सन 1990 साली ऑगस्ट महिन्यात  नगर परिषद  सेवेत रुजू होवून, मागील 34 वर्षांच्या कार्यकाळात नगरपरिषद कार्यालयातील सिव्हिल इंजिनिअर,स्वच्छता निरीक्षक,  रमाई आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास,कार्यालयीन अधीक्षक अशा विविध विभागात सेवा बजावली असून , दि.31/12/2024 रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने कार्यालयाच्यावतीने दि.13 रोजी त्यांचा सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला. याप्रसंगी नवीन कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी,लेखापाल कृष्णा काळे, लोहारा नगरपंचायत चे लेखापाल अंकुश माने,शहर अभियंता राजन वाघमारे,नगर रचनाकार संदीप जाधव, पाणी पुरवठा अभियंता जी.एस.पुरी,संगणक अभियंता महेश शिंदे,स्वच्छता निरीक्षक दनाने, एम. एस जंगले,ए.पी.राऊत, शेषेराव भोसले, विवेक शाहीर, बालाजी जाधव,मारुती सरपे, मंजूर शेख, माधव नागराळ, रमेश हजारे, विशाल माळी, बाळु माने, किरण क्षिरसागर, इरफान शेख, असलम शेख, आकाश सरपे, राजु कटके, प्रविण चौगुले, ओमकार रणदिवे, लखन आबाचने, लखन चव्हाण, दिपक धोत्रे, सलीम सास्तूरे ,बबलू जमादार, शिवानंद सुर्यवंशी, रमेश शिंदे. ऐल्लाप्पा दंडगुले, बी.जी.गायकवाड, आदी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ कांबळे यांनी तर प्रस्ताविक पाणीपुवठा अभियंता जी.एस. पुरी यांनी केले, तर आभार लोहारा नगरपंचायतचे लेखापाल अंकुश माने यांनी मानले. कार्यक्रमास नगर परिषदचे कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here