उमरगा :- अतिरिक्त जिल्हा न्यायालय उमरगा येथे मागील अनेक वर्षांपासून वकीली व्यवसायात पारंगत असलेले अँड.प्रभाकर उर्फ बापू पाटील व ॲड.दादाराव कातपुरे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. ॲड.प्रभाकर पाटील व ॲड.दादाराव कातपुरे यांच्या नियुक्तीचे उमरगा तालुका परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.
नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून वकील यांना ओळखले जाते. ते कायदेशीर व्यावसायिक आहेत. काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार आहे. रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे आवश्यकती तिकीटे लावावी लागतात.ॲड.प्रभाकर पाटील बलसुर व दादाराव कातपुरे माडज यांची त्यांच्या गावातून व उमरगा तालुक्यातून निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे