महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वर सक्त कारवाईची शिव – बसव प्रतिष्ठानची मागणी 

0
95

उमरगा :- भालकी मध्ये श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटत आहेत. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वर सक्त कारवाई करण्यात यावी ही मागणी शिव – बसव प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (दि. १६) रोजी करण्यात आली. भारतातील थोर समाजसुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथील पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली आहे.जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा विटंबना केली ही घटनाच निषेधार्ह आहे. महात्मा बसवेश्वर हे थोर समाजसुधारक आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव जगभर पसरला आहे. अशा महान महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना व्हावी, ही घटना खेदजनक आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून सदरील आरोपींना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा याप्रश्नी शिव-बसव प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.      यावेळी शिव -बसव प्रतिष्ठानचे पदाधिकारी दिनेश बिराजदार, निखिल वाघ,गिरीश अष्टगे, प्रविण पाटील, शिवकुमार पुरतं,अभय अष्टगे, अतुल वरकले, विजय अष्टगे,सुमीत दडंगे,आकाश परांडे,स्वप्निल पुजारी,उमेश आबाचने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here