उमरगा :- तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांची प्रदेश कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्याबद्दल मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी दि.१७ रोजी सत्कार करण्यात आला . तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांचा १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव स्नेहाताई खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील जिल्हा आणि प्रदेश कार्यकारणीच्या निवड प्रक्रिया पार पडली.जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके, उपाध्यक्ष वर्षाताई माने, कार्याध्यक्ष विभावरीताई ताकट, प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, राजश्रीताई शितोळे, वैशालीताई कडू, ताई बोराडे, नंदाताई शिंदे, स्वातीताई पवार आधी प्रदेश कार्यकारणी च्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले होते .सिंदखेडराजा येथे सुनंदाताई माने -विभागीय कार्याध्यक्ष , मंजुषाताई चव्हाण- विभागीय सचिव, रेखाताई पवार- धाराशिव जिल्हाध्यक्ष, संध्याताई शिंदे -जिल्हा कार्याध्यक्ष आदींची निवड झाली होती. त्यांच्या निवडीबद्दल उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात त्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच दैनिक दिव्यमराठीचे तालुका प्रतिनिधी अंबादास जाधव यांना उदगीर येथील पत्रकार संघाचा मराठवाडा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शांताकुमार मोरे , जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माने , शहराध्य अनिल सगर , संभाजी ब्रिगेडचे विशाल माने , मंगेश भोसले , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी , विभागीय अध्यक्षा रंजनाताई चव्हाण , लातुर जिल्हा संघटक शोभताई पाटील , जिल्हासचिव जिवनताई जाधव , ज्योतीताई रजपूत , प्रीतीताई शिंदे , मीराताई चव्हाण ,पूजाताई सूर्यवंशी आदी उपस्थित होते .