उमरगा :- श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर मौजे जकेकुरवाडी येथे सुरू असून यामध्ये आयोजित”2024 च्या अर्थसंकल्पातील युवकांसाठीच्या योजना”या विषयावर आधारित गट चर्चेला मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. वसंत हिस्सल सर यांनी केंद्र सरकारने २०२४अर्थसंकल्पत युवकांसाठीच्या विविध योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली . या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती, कौशल्य विकास प्रशिक्षण व लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यावर सरकारने भर दिलेला दिसून असे प्रतिपादन त्यांनी यादरम्यान केले. युवकांसाठी असलेल्या योजनेवर साधक बाधक अशी चर्चा घडवून आणली. हा कार्यक्रम रासेयो,अर्थशास्त्र विभाग & वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अजित आष्टे यांनी भूषवले . अर्थसंकल्प कोणकोणत्या घटकाचा अंतर्भाव हा केला जातो याची सविस्तर माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणात आष्टे सरांना विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ गिरीधर सोमवंशी सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री प्रज्वल चव्हाण यांनी केले. तर आभार श्री निरंजन कटके यांनी मांडले.