प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

0
233

 

उमरगा :- तालुक्यातील नाईचाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.18 रोजी डॉ.स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. स्वाती चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी करीता आलेल्या गरोदर मातांना गरोदर कालावधीत घ्यावयाच्या काळजी संदर्भात माहिती देण्यात आली.

 

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण,औषध निर्माता अधिकारी विकास सुर्यवंशी, औनिअ अमृता पाटील, माधुरी शिंदे, हेमलता काळे, भाग्यश्री काळे,शुभांगी स्वामी, इंदुमती टिकंबरे, वनमाला जमादार, दिपमाला लोखंडे, काजल जाधव, रेखा भंडारे, सर्व आशा कर्मचारी तसेच गावातील गरोदर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here