श्रमदानातून ग्राम विकासासाठी रासेयो स्वयंसेवकांनी लावला हातभार

0
68

 

उमरगा :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर जकेकुरवाडी येथे चालू असून या शिबिरादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जकेकुरवाडी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा व गावामध्ये लावलेली अकराशे नारळाच्या झाडांना तनमुक्त करून आळे करण्याचे काम रासेयोच्या विद्यार्थ्यांनी केले.तसेच गावामध्ये चालू असलेल्या भूमीअंतर्गत गटारीचे कामे ही रासेयोच्या विद्यार्थ्यांनी केली.या श्रमदानामध्ये ग्रामस्थ महेश माने तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गिरीधर सोमवंशी, डॉ. भरत शेळके, प्रा. मुरलीधर जाधव, प्रा. सुजित शिंदे, प्रा. विजय पवार, प्रा. डी डी पांढरे प्रा. एस आर चव्हाण,प्रा. एम.डी. गायकवाड, डॉ.व्ही एम गायकवाड,डॉ. आर.एम सूर्यवंशी डॉ. एस एल राठोड,डॉ. ए.डी.देशमुख आदींनी हातभार लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here