डॉ रामानुजन ई-लर्निंग इंग्लिश मेडियम स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन

0
115

 

 

उमरगा  : शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान व पर्यावरणाशी असलेले नाते दृढ होण्यासाठी या प्रदर्शनाची गरज आहे. मानवी जीवनात विज्ञान महत्वाचे असून लहान वयातच विज्ञानाची जाण झाली तर भविष्यात हीच मुले वैज्ञानिक निर्माण होवू शकतात, असे विज्ञान प्रदर्शन सर्वच शाळा व ग्रामीण भागातील शाळेतून भरविले जावे असे मत प्रा डॉ कोमल गोमारे यांनी व्यक्त केले.

शहरात डॉ. रामानुजन ई-लर्निंग इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये रविवारी(१९) ८ व्या विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद देत १४५ बालवैज्ञानिकांनी ९० स्वनिर्मित प्रयोगाचे सादरीकरण केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी डॉ. गोमारे बोलत होते.यावेळी डॉ विक्रांत शिंदे, गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, पत्रकार अंबादास जाधव, संस्था अध्यक्ष तथा संयोजक महेश अंबर उपस्थित होते प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश अंबर प्रास्ताविकात माहिती व तंत्रज्ञानाचे युगात बालपणापासून वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण होणे व गणित मेळाव्याचे आयोजन गरजेचे आहे. या मधूनच नवनवीन शोध लागण्यास मुलांना मदत होण्याबरोबरच मुलांनी सादर केलेल्या प्रयोगाचा दैनंदिन वापरात उपयोग होणे महत्वाचे आहे. या विज्ञान प्रदर्शनात या बालवैज्ञानिकांनी जागतिक तापमान वाढ,पर्यावरण प्रकल्प, पाण्याची बचत, विकसित शहरे,ग्रामीण खडे गाव,वृक्षारोपण अन संवर्धन, टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती, विजेची बचत, पाणीबचत, शारीरिक रचना, ह्रदय किडनी प्रक्रिया, सोलार,हवेचा दाब आदीसह विविध ९० विषयांवरती प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते. प्रदर्शनासाठी प्राचार्या गंगाताई अंबर, दुर्गाताई बिद्री, श्रीनिधी घोडके, अंकिता पुजारी, संध्या मंमाळे, कांचन आलमाळे, कल्याणी बबलादे, निशा कोकणे, भाग्यश्री पाटील, सचिन पाटील, अनिता गडदे आदींनी पुढाकार घेतला.या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रा लक्ष्मण पवार, प्रा डॉ धनंजय मेनकुदळे, कृषी सहाय्य्क शिवशंकर बिद्री, प्रा सचिन राजमाने, प्रा मारुती व्हन्नळे, डॉ बालाजी इंगळे, मुख्याध्यापक अण्णप्पा सर्जे, आदर्श प्राथ मुख्याध्यापक शिवराज औसेकर, माता व पालक व नागरिक उपस्थित होते. श्रीमती दुर्गा बिद्री यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती गंगा अंबर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here