कोरेगाववाडी येथील शिवाई शैक्षणिक संकुलात फ्रेशर पार्टी 

0
53

 

उमरगा:- तालुक्यातील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी येथे.  दि. 20 रोजी  फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  बी .एच .बेडदुर्गे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, डॉ.सारिका बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. विदयार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाकृती यावेळी सादर केले. यामध्ये नृत्य, सामाजिक नाटके, गीत गायन, कविता, समूह नृत्य,लावणी, शायरी अशा विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने वक्तृत्व, निबंध, विविध खेळ यामध्ये भाग घ्यावा. जेणेकरून अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे यावेळी म्हणाले. सचिव डॉ. बी.एच. बेडदुर्गे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी व उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. डी.फार्मसी विभागातून कु.मुसेब पटेल (मिस्टर फ्रेशर)व कु.कौसर शेख (मिस फ्रेशर) तर बी.फार्मसी विभागातून कु.अक्षय पुजारी (मिस्टर फ्रेशर) व कु.आरती देशमुख (मिस फ्रेशर) म्हणून निवडण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.फार्मसी द्वितीय वर्ष व बी.फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, महेश थोरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी जाधव, कु.समिना मुल्ला, कु. श्रद्धा पाटील व आभार प्रदर्शन कु.प्रज्ञा बोळे हीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here