विज कामगार महासंघाच्या विभागीय अध्यक्षपदी पाटील, तर सचिवपदी गुरव

0
143

 

 

 

धाराशिव:-  येथे मंगळवार (दि.२१) रोजी महाराष्ट्र राज्य विज कामगार महासंघाची नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक .गोविंद अयाचित, प्रमुख पाहुणे.उंद्रे बापु,निवडणूक अधिकारी नारायण गडगडे,लातूर परिमंडळ अध्यक्ष नवनाथ बडे, परिमंडळ सचिव प्रवीण रत्नपारखी यांची उपस्थिती होती. यावेळी मान्य वरांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सन 2025ते 2027 या कालावधीच्या नूतन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.यात तुळजापूर विभागीय अध्यक्षपदी अमोल पाटील, सचिवपदी मोहन गुरव,संघटनमंत्री अनिल कोल्हे, कोषाध्यक्ष आप्पाराव लवटे,प्रसिद्धीप्रमुख महमद लदाफ यांची निवड करण्यात आली.या सर्व नूतन पदाधिकऱ्यांना मान्य वरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

या वेळी धाराशिव मंडळ अध्यक्ष शाम आबाचने,उपाध्यक्ष विकास गाडेकर,सचिव निलेश भिरंगे,सहसचिव सातय्या स्वामी,रणजित मोटे,संघटनमंत्री शिवाजी दूधभाते,कोषाध्यक्ष जयकर कोळगे,प्रसिद्धी प्रमुख विनोद कुंभार, दलूचंद बोंदर,उमाकांत जाधव विलास अहिरे, यांच्यासह धाराशिव मंडळातील महासंघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here