बाबळसूर पाटी जवळ अपघात; वडील व मुलगी जखमी

0
834

 

उमरगा :- लातुर – उमरगा रोडवरील बाबळसुर पाटी जवळ अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीवरील वडील व मुलगी जखमी झाले असल्याची घटना दि. 23 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता घडली आहे.

 

उमरग्याच्या दिशेने येणारी दुचाकी क्रमांक MH13 AW 7393 ही बाबळसुर पाटी जवळ येताच पाठीमागुन येणार्‍या अज्ञात कारने धडक दिल्याने दुचाकीवरील प्रदीप गोविंद सुगावे वय 42 वर्ष रा. माडज ,ता. उमरगा , पुनम प्रदीप सुगावे वय 10 वर्ष रा.माडज, ता. उमरगा हे दोघे अनुक्रमे वडील व मुलगी जखमी झाले असल्याची घडली असून,
सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here