उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या मुबंई- हैद्राबाद महामार्ग क्रमांक 65 वरील बायपास रोडवरील धामी धाब्या जवळ ट्रकला आग लागून दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना दि. 25 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता घडली आहे.
मुबंई- हैद्राबाद महामार्गावरील धामी धाब्या जवळ डिझेलच्या टँकरला वेल्डिंग मारताना ट्रक क्रमांक MH25 U 3599 ला अचानक आग लागल्याने वेल्डर व ट्रक चालक भाजुन गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्याची नाव ,ट्रकचालक इब्राईम नवाज शेख वय- 45 रा. उमरगा , वेल्डिंग करणारा अरविंद तानाजी पीसके रा. गुगळगाव ता. उमरगा अशी आहेत.
सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.