राहत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रजासत्ताक दिनी सामाजिक उपक्रम

0
389

 

 

उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दि. 26 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

सामाजिक बांधिलकी जपत गरजू , वंचित व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी नगर परिषद कार्यालया समोर एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत चॉकलेट, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी , युवा सेनेचे किरण गायकवाड ,उपविभागीय अधिकारी गणेश पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, रज्जाक अत्तार ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितिन होळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राहत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जाहेद मुल्ला ,सेक्रेटरी खलील शेख,अल्लाउद्दीन शेख ,वाहब अत्तार,रीयाज पंढरपुरे,अमजद मनियार ,मंजुर शेख,हाफिज समीर ,हाफिज नवाब ,मुस्तफा लदाफ,जाकिर अत्तार,इसाक शेख,अल्ताफ पटेल,सैफण लदाफ,शकिल शेख,साहिल मुल्ला ,नयुम शेख,अहमद शेख,आखील जमादार ,सोहेल लदाफ आदिंनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here