माडज पाटी जवळ दुचाकीचा अपघात ; एक गंभीर जखमी

0
433

उमरगा :- तालुक्यातील लातुर रोडवरील माडज पाटी जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दि. 28 रोजी रात्री ठीक 7:45 वाजता धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
उमरगा येथून कवठा गावाकडे जाणारी मोटार सायकल क्रमांक MH25 AY 9869 ही माडज पाटी जवळ येताच अज्ञात वहनाने कट मारुन निघुन पसार झाला असून, मोटार सायकल चालक पीताबंर पुंडलीक कांबळे वय 47 रा. कवठा, ता. उमरगा हे खाली पडुन गंभीर जखमी झाले आहेत .
सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले
असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.
.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here