उमरगा :- तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 30 रोजी महिला मेळावा व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमास विस्तार अधिकारी कदम , माडज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जोशी, नारंगवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुतार , उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, ॲड. शुभदा पोतदार ॲड. फरहीन खान पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सरवसे, शिक्षणतज्ज्ञ संजय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे-भुसार , शिक्षक चौधरी ,स्वामी,भंडारे,साखरे ,श्रीम.साळुंके,झिंगाडे,गायकवाड ,आळणे , टाटा पॉवर प्रकल्प शिक्षिका सौ.सुरवसे व युवा कार्य शिक्षण प्रशिक्षणार्थी सौ.पाटील आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाचे विविध कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी ताई , गावातील महिला, किशोरवयीन मुलींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे-भुसार यांनी महिला मेळावा, तीळगुळ कार्यक्रम व विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यामागचा हेतू सांगत त्याचा शाळेतील विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल हे सांगून शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.