वडगांव (गां) साठवण तलावाचे काम लवकर सुरु करा  माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्याकडे  मागणी 

0
194

वडगांव (गां) साठवण तलावाचे काम लवकर सुरु करा  माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्याकडे  मागणी

लोहारा   :- तालुक्यातील वडगांव (गां) येथील ग्रामस्थांनी दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेना उपनेते तथा माजी आ. ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन वडगांव (गां) येथील साठवण तलावाचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन दिले. यासंदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करून तात्काळ काम चालू करू, अशी ग्वाही शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी दिली. व संबंधित अधिकारी कापसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी, कंत्राटदार पतंगे यांच्याशी त्यांनी फोनवरून या कामासंदर्भात चर्चा केली. व कोणतेही काम असुद्या ते मार्गी लावण्यास मि कटिबद्ध आहे, असे आश्वासन याप्रसंगी ग्रामस्थांना दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळी मामा सुरवसे, स्वीय सहाय्यक प्रदिप इंगळे-पाटील, उपसरपंच (वडगांववाडी) अंकुश भुजबळ, महादेव कार्ले, मधुकर गिराम, निकेश बचाटे, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here