उमरग्यात रोटरी ,व्यापारी महासंघाच्या वतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा संपन्न 

0
196

 

उमरगा : – रोटरी क्लब व व्यापारी महासंघाच्या वतीने शहारात खुली मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. दोन) रोजी संपन्न झाली. सकाळी सहा वाजता शहरात आयोजित केलेल्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातुन २०० मुला, मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी गणेश पवार, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले व रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंके, सचिव जुगल खंडेलवाल, प्रोजेक्ट चेअरमन अनिल मदनसुरे, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ. सुनंदा माने व सौ. दिपाली स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.या स्पर्धेत २०० मुला, मुलींनी दहा किलोमीटर अंतर पूर्ण करुन स्वतःचा आत्मविश्वास दाखवला. हि स्पर्धा खुला पुरुष, महीला व ४५ वर्षावरील पुरुष या गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेत पुरुष खुला गटात वक्रसेन जाधव (प्रथम) सात हजार एकशे, विराज जाधवर (द्वितीय) पाच हजार एकशे तर नामदेव भोसले यांनी तृतीय तीन हजार एकशे रूपये व स्मृतीचिन्ह मिळवले. खुला गट महीलां मधुन प्रिती माने (प्रथम) तीन हजार एकशे, दुर्गाशक्ती पवार (द्वितीय) दोन हजार एकशे तर राधा मम्मीने (तृतीय) अकराशे रुपये व स्मृतीचिन्ह पटकाविले. ४५ वर्षावरील खुल्या गटातुन गोविंद चौधरी (प्रथम) तीन हजार एकशे, विद्यासागर फुलसुंदर(द्वितीय) दोन हजार एकशे तर शिवाजी पांचाळ (तृतीय) अकराशे व स्मृतीचिन्हाचे मानकरी ठरले. या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक देण्यात आले. विजेत्या मुला, मुलींना माजी आमदार ज्ञानराज चौगुले, रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार सचिव जुगलकिशोर खंडेलवाल यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेतील बक्षिसे माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अनिल सगर, डॉ. विजय बेडदुर्गे, मनेष माणिकवार, प्राचार्य संजय अस्वले, प्रा. धनंजय मेनकुदळे, अॅड. अक्षय तोतला, नितीन होळे यांच्या वतीने देण्यात आली.  प्राचार्य संजय अस्वले, प्रशांत कुलकर्णी, डॉ.नजीर शेख, व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा, उपाध्यक्ष मनेष माणिकवार , मनिष सोनी, कलशेट्टी पाटील, अमर परळकर, प्रा युसूफ मुल्ला, डॉ. राजकुमार कानडे, संतराम मूरजानी, मुख्याद्यापक अजित गोबारे, रणजीत बिराजदार, परमेश्वर सुतार, प्रा. राजू जोशी, पुष्पलता पांढरे, प्रा. रवि आळंगे, शिवकुमार दळवी, विकी चव्हाण, ओंकार मदने, दादाराव कोलगे,कृष्णा मोरे, गणेश वाघमोडे, संदीप दामावले आदींनी परीश्रम घेतले. संजय देशमुख यांनी सुत्रसंचलन केले तर आभार परमेश्वर सुतार यांनी आभार मांडले. यावेळी विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here