उमरगा :- शहरातील भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा अंतर्गत चालू असलेल्या संगणक विभागाच्या वतीने दिनांक 03 फेब्रुवारी 2025 वार सोमवार रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला . यावेळी प्राचार्य डॉ. संजय अस्वले अध्यक्षस्थानी असून महाविद्यालयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना व पालकांना अवगत केले. प्रमुख उपस्थिती डॉ. विलास इंगळे त्यांनी विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये उपस्थिती असावी यासाठी त्यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रेवते एस एस यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पालक मेळावा आयोजित करण्याचे व तसेच विभागातील चालू असलेल्या कोर्सची कॉलेजची माहिती सांगून मार्गदर्शन केले. डॉ. शेळके बी ए यांनी संगणक विभागात असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचा उत्कृष्टरित्या परिचय करून देण्यात आला. या कार्यक्रमात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम यावर प्रा ए बी कांबळे माहिती सांगून पालकांना मार्गदर्शन केले. यानंतर गोलदास वजाहद व राहुल पाटील या पालकांनी ही आपले मनोगत मांडले. त्याचबरोबर अमृता माळी, गायकवाड नीलकंठ ,सुहानी गायकवाड, किरण भंडे, गायकवाड साक्षी, कारभारी विशाखा या विद्यार्थ्यांनी मनोगत भाषणातून मनोगत मांडले. या कार्यक्रमासाठी भरपूर संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नम्रता यांनी व कार्यक्रमाचा आभार प्राध्यापिका रेश्मा नितनवरे यांनी मानला.