लोहारा :- तालुक्यातील अचलेर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रकल्प बालविकास अधिकारी गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.5 रोजी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे पालक मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन सरपंच कांताबाई सुभाष सोलंकर, ग्रामिण आरोग्य केंद्र आष्टा कासार येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. पांढरे, ग्रामविकास अधिकारी घनशाम कोकाटे, अदि उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारचे खेळ, आरोग्य विषयक संदेश, लहान मुलांना आहार कसे द्यावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन आष्टा बिटच्या पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेवळी बिट, आष्टा बिट, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, अदिंनी परिश्रम घेतले.


