लोहारा:- “रथसप्तमी निमित्त” न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थांनी दि.4 फेब्रुवारी 2025 रोजी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. याप्रसंगी जनकल्याणचे शंकर जाधव यांनी सूर्यनमस्कार मंत्राचे उच्चारण करून विध्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसह प्राचार्य शहाजी जाधव, प्रा.यशवंत चंदनशिवे यामध्ये सहभागी झाले होते. यानंतर सूर्यनमस्कार घालण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 6 विद्यार्थ्यांनी 100 सूर्यनमस्कार घातले. यात प्रथम – आकांक्षा पवार हिने 125 , द्वितीय – श्वेता कार्ले – 123 , तृतीय – भाग्यश्री रवळे 108, चतुर्थ – गौरी धवन 106 सूर्यनमस्कार घालून यश प्राप्त केले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शंकर जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून गौरविण्यात आले.