उमरगा: येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.7 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्ट्याच्या वतीने बी. ए, बी. कॉम व बी.एससी तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस )कंपनीतील निवड पूर्व मुलाखत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अंतर्गत महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले जाते. ज्याच्या माध्यमातून बहुसंख्य विद्यार्थी विविध पदावर पुणे, मुंबई, औरंगाबाद व इतर राज्यातील शहरात कार्यरत आहेत. यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष 2024 -25 करिता एकूण 16 विद्यार्थ्यांनी टी.सी.एस कंपनीतील विविध पदासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना निवड पूर्व मुलाखत कशी द्यावी याबद्दलचे सखोल मार्गदर्शन प्रा.डॉ. करे सी.डी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी शिष्टाचार ड्रेस कोड, स्व-परिचय, आवाजातील चढ-उतार, देहबोली व इतर बाबी विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी, टीसीएस साठी नोंदणी केलेली विद्यार्थी व एन.सी.सी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.