दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी —  शरण भैय्या पाटील

0
275

 

 

 

उमरगा – धाराशिव जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे. या जिल्ह्यात दिव्यांगाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धाराशिव जिल्हयातील दिव्यांगाना सन्मानाने जगता यावे या साठी दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन तथा युवा नेते शरण भैय्या पाटील यांनी दिली आहे.
सक्षम ,ओएनजीसी , श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मशी सारथी स्मार्ट केन व ज्योति स्मार्ट एआय यांच्या वतीने धाराशिव जिल्हयातील तुळजापूर , उमरगा , लोहारा या तालुक्यातील दिव्यांगाना चष्म्याचे व दिव्यांग साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या वेळी आयोजित दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमात शरण पाटील बोलत होते. सक्षम तथा दिव्यांग सशक्तीकरणाचे केंद्रीय सदस्य व सल्लागार सुरेश दादा पाटील, टार्चचे प्रमुख दिनेश बघेल अहमदाबाद , संवेदना प्रकल्प लातूरचे व्यकंट लामजणे,कृउबाचे सभापती बसवराज कस्तुरे, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, योगेश राठोड , रफिक तांबोळी पं.स. चे माजी सभापती सचिन पाटील , महालिंग बाबशेट्टी, राजू मुल्ला, गौस शेख, प्रा. भरत मारेकर सह आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले कि – दिव्यांगा साठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजना ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थी पर्यंत पोंहचत नाहीत. या योजना दिव्यांगा पर्यंत पोंहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. दिव्यांगाना कायद्याने सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला आहे. कायद्याने दिलेल्या हक्काची जाणीव दिव्यांगाना करून देऊन दिव्यांगाचे जगणे समृद्ध करा. दिव्यंगाच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांचे जगणे सुखी समाधानाचे करा. दिव्यांगाना सन्मानाने जगण्याचा आधार बना. दिव्यांगाना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या दिव्यांग केंद्रासाठी स्वतंत्रपणे दोन एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. दिव्यांग सुविधा केंद्र उभारणीचा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे मंजूरी साठी पाठविण्यात आला आहे. अल्पावधीत धाराशिव जिल्ह्यातील हजारो दिव्यांग लाभार्थीना या दिव्यांग सुविधा केंद्राचा लाभ होणार आहे. या दिव्यांग सुविधा केंद्राच्या उभारणी मुळे जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार असल्याचे हि शरण भैय्या पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगाच्या सशक्ती करणा साठी विविध योजना सुरु केल्या आहेत. देशातील हजारो विविध प्रकारच्या दिव्यांगाना या योजना मार्फत कृत्रिम हातपाय अवयव , चष्मे , स्मार्ट केन , एअर मशिन्स व्हील चेअर या विविध साहित्याचे मोकत वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग सेवा हि महान ईश्वरी सेवा या आहे. दिव्यांगाच्या आनंदी जगण्यासाठी माणुसकीच्या नात्याने समाजाने पुढे येण्याची गरज आहे. उमरगा येथे युवा नेते शरण पाटील यांच्या पुढाकारातून स्वतंत्र दोन एकर जागेवर दिव्यांग सुविधा विशेष केंद्राची उभारणी केली जात असल्याने केंद्रीय दिव्यांग कल्याण समितीचा सल्लागार म्हणून आपण अपेक्षित सहकार्य करणार असल्याचे मत दिव्यांग सशक्तीकरण केंद्रीय मंडळाचे सल्लागार तथा सदस्य सुरेश दादा पाटील यांनी व्यक्त केले.
दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमात ऐंशी लाभार्थींना १५ लाख बारा हजार रुपयांच्या चष्म्याचे तर १५० लाभार्थींना पाच लाख ५१ हजार रुपये किंमतीच्या अंधकाटी अर्थात स्मार्ट केनचे वाटप करण्यात आले. आज एकूण २५ लाख रुपये किंमतीच्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. पंधरा दिवसा पूर्वी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उमरगा लोहारा तालुक्यातील १५० दिव्यांग लाभार्थीना दोन कोटी रुपये किंमतीच्या कृत्रिम हात पाय अवयवाचे वाटप करण्यात आले होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर यांनी केले .सुत्रसंचालन प्रा. किरण चोपणे व प्रा. आरती पाटील यांनी केले. आभार उपप्राचार्या ज्योति आरसुडे पेठकर यांनी मानले . कार्यक्रमा साठी श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्यशी , आदर्श महाविद्यालतील प्राध्यापक , कर्मचारी मोठ्या संख्येनि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here