उमरगा : उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उमरगा येथील बिरूदेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशुप्रदर्शनातील विविध गटातील विजयी पशु मालकांच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन दि .९ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते . उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले तर या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील ,सचिन पाटील, पं .स.उपसभापती गोविंद पाटील ,दगडू मोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शंतनु सगर, सुशील दळगडे, शमशोद्दीन जमादार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, पशुप्रदर्शन तथा नियोजन समितीचे सभापती सुभाष गायकवाड, सचिव सिद्धाप्पा घोडके यांची उपस्थिती होती . उमरगा येथील बिरदेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशुप्रदर्शनामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यामध्ये १२५० जनावरांची अधिकृत नोंद झाली असून ८३२ जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार संपन्न झाला . तर साधारणतः चार कोटी रुपयाची उलाढाल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून झाली आहे . येथे ९ गटात घेण्यात आलेल्या उत्कृष्ट पशुंच्या स्पर्धेमधील पशुमालक विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले . खिल्लार खोंड अदात गटात विकास गायकवाड माडज प्रथम, खिल्लार खोंड दोन दात गटात पप्पू भोसले नेलवाड प्रथम, खिल्लार खोंड चार दात सहा दात गटात बाजीराव बिराजदार रामतीर्थ प्रथम, संकरित गाय गाभण गटात संभाजी कलबुर्गी कदेर प्रथम , उस्मानाबादी बोकड गटात खंडात देवकते दाळिंब प्रथम, उस्मानाबादी शेळी गाभण गट बाबुराव पाटील कसगी प्रथम, संकरित कालवड संभाजी कलबुर्गे कदेर प्रथम, आधार कार्ड संगीता कुडके उमरगा प्रथम, खिल्लार गाय गाभण गटात रजनीकांत वाघे कसगीवाडी प्रथम या विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणधीर पवार, मंगलबाई औरादे, शरद माने ,मारुती पाटील, कृष्णा माने, आदीसह परिसरातील पशुपालक, शेतकरी ,व्यापारी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते .