प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंबई पोलिसात भरती ; राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सत्कार

0
28

 

उमरगा  : शहरातील एका ट्रक चालकाचा मुलगा घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलिस दलात भरती झाला. मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असते त्यात घरात कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना शहरातील समीर शेख या तरुणाने मुंबई पोलिसाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शहरातील सामाजिक संस्था राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने समीर शेख चा सत्कार करण्यात आला यावेळी राहत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जाहेद मुल्ला, वहांब आत्तार , खलील शेख, इरफान चौधरी, अमजद मणियार, अझर शेख, रियाज पडरपुरे, मंजूर शेख, वशीम चौधरी, हाफिज समीर, हाफिज सगीर, मुस्तफा लदाफ, अझर मर्चंड, अमीर पठाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here