लोहारा:- तहसीलदार म्हणुन रणजितसिंह कोळेकर रुजु झाल्याबद्धल व तालुक्यातील नागुर येथील धनगर समाजातील युवक डॉ.सुनील इंद्रजीत वरवटे यांची केंद्र शासनाच्या कृषी अधिकारी वर्ग 1 ( शास्त्रज्ञ) या पदावर निवड झाल्याबद्धल लोहारा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे दि.12 रोजी सांय. 8 वा. यांचा यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रस्ताविकपर मनोगत व्यक्त करताना डॉ. हेमंत श्रीगिरे म्हणाले कि, सुनिल वरवटे यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन यश संपादन केल्याची सविस्तर माहिती देऊन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व सुनील इंद्रजीत वरवटे यांचे अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी जगदिश लांडगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व सुनिल वरवटे यांचा आदर्श समोर ठेऊन आपल्या मुलांना व मुलींना शिक्षण द्यावे. मुलांनी व मुलींनी परिस्थितीवर मात करीत शिक्षणात भरारी घ्यावी, असे यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व सुनिल वरवटे यांनी शिक्षण घेत असताना आपल्यालाआलेले प्रसंग सांगुन जिद्द व चिकाटीने यश संपादन केल्याची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ.रुपाली श्रीगिरे, माजी उपसरपंच व्यंकट घोडके, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, उबाठा शिवसेना नेते पंडित बारगळ, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, अखिल भारतीय धनगर समाज महासंघ प्रदेश सरचिटणीस तथा कॉग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्ता गाडेकर, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका सरचिटणीस उमेश देवकर, सुरेश वाघमोडे, इंद्रजित वरवटे, लतीका वरवटे, केशरबाई वरवटे, प्रा.लक्ष्मण गायकवाड, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, सुर्यकांत पांढरे,भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार गणेश खबोले, राजु बंडगर, युवा नेते प्रशांत थोरात, युवा नेते प्रेम लांडगे, आकाश विरुद्धे, कृष्णा विरुद्धे, अनिल घोडके, उत्तम अण्णा पाटील, योगेश गाडेकर, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत पांढरे यांनी केले तर आभार सुरेश वाघमोडे यांनी मानले.