उमरगा – तालुक्यातील कोरेगाववाडी येथील ग्रामविकास अधिकारी सौ.शुभांगी संभाजी वाघमोडे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून चार लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी शेषेराव लवटे आणि त्यांच्या चार ते पाचसाथीदारांना आरोपी करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कोरेगाववाडी येथील शेषेराव लवटे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली होती. ही माहिती सौ. वाघमोडे यांनी नियमानुसार दिली होती. मात्र ही माहिती लवटे यांना समाधानकारक वाटत नसल्याने संबंधित या पत्रानुसार त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसताना ता. 06 जाने वारी रोजी पंचायत समिती कार्यालयास बिनबुडाचे आरोप करुन माझी व ग्रामपंचायतची विनाकारण बदनामी करित आहेत. ही बाब गावातील सार्वजनिक ठिकाणी व ग्रामविकास कोरेगाववाडी या Wats App ग्रुपवर बदनामीकारक संभाषण करित आहेत. त्यामुळे माझे विनाकारण मानसिक खच्चीकरण होत आहे. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कोरेगांववाडी ग्रामपंचायत कड़े जाताना शुक्रवारी ता.07 रोजी सकाळी 10.00 वाजता रोडवर शेषेराव लवटे व त्यांचे चार ते पाच साथीदार यांनी मला अडवून अश्लील बोलून मी अर्ज मागे घेतो मला चार लाख रुपये दे नाहीतर तुला ॲम्बुलन्सखाली उडवून टाकतो अशी धमकी दिली आहे. मला जिवे मारण्याची धमकी सरपंच यांचे समक्ष दिलेली आहे.या घटनेनंतर सौ. वाघमोडे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार रात्री 01 वा. सुमारास दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 79, कलम 352, कलम 351(2), कलम 351(3), कलम 189(2) कलम 191(2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. हे.कॉ.अनिल बोदमवाद करीत आहेत.