नळदुर्ग येथील पणन जवळ राष्ट्रीय हायवेवर भीषण अपघात ; ४२ वर्षीय  तरुणास  ट्रकने चिरडले ,एकाचा जागीच मृत्यु तर एकजण गंभीर जखमी

0
2052

 

दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग :-  या ऐतिहासिक शहरात राष्ट्रीय हायवेवर आपघाताचे सत्र चालुच आहे नळदुर्ग शहरातून बायपास रस्ता चालू झाला आसला तरी नळदुर्ग शहर आणि हायवेचा परिसर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे नळदुर्ग शहरातून बाजार करून अणदूर च्या दिशेने येथील यूवक दयानंद पंडीत भोसले वय वर्ष ४२ व त्यांचा म्हेवणा प्रज्योत युवराज काळे वय वर्ष २३ दोघे राहाणार अणदूर ता .तुळजापूर जि. धाराशिव येथील रहीवाशी  असुन ते दोघे नळदुर्ग कडुन स्वःताच्या मोटर सायकल क्रमांक MH २५ BA ११६६ या गाडी वरून घरी म्हणजे अणदूर कडे परतीचा प्रवास करताना नळदुर्ग येथील गोलाईच्या जवळ पणन समोर ट्रक क्रमांक MH १३ A X २७६२ या जड वाहानाने मोटर सायकल स्वारला पाठीमागून जोराची घडक दिल्याने सदरील मोटर सायकल खडयात दुरवर फेकली गेली व दयानंद पंडीत भोसले हा ४२ वर्षाचा तरुण चक्क पाठीमागच्या बाजूस गाडीच्या चाकाखाली चक्क चिरडला गेला खुप मोठा आणि महा भयानक अपघात घडला आहे .

 

 

पारधी समाजाचे नेते पंडीत भोसले यांचा तो मुलगा  असुन आई ,वडील ,पत्नी ,मुले ,भाऊ आदीनी हंबरडा फोटला नळदुर्ग शहरात गोलाईच्या बाजुला पणन समोर झालेला आपघात कळताच नळदुर्ग शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक उमाजी गायकवाड , पोलीस कर्मचारी खलील शेख , एस पी कांबळे , विलास चव्हाण , एस बी फुलसुंदर , सह होमगार्ड कर्मचारी आदीनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .प्रेत गाडीच्या चाका खाली प्रेत आडकल्याने या प्रेताला क्रेन मागवुन संबंधीत ट्रकची पाठी मागची बाजु उचलून धरले आणि प्रेत ओढुन घेतले आशी महा भयानक घटना घडली आहे दयानंद पंडीत भोसले यांचे प्रेत शवइच्छेदाना साठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले  असुन,

 

जखमीला सोलापूर येथे हालविण्यात आले आहे ‘ यावेळी नळदुर्ग शहर पोलीस हायवे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत , पोलीस कर्मचारी सतीश पवार ,पंकज कोळी , सागर काकडे , राजकुमार क्षिरसागर यांनी हायवे वरील रहदारी कमी करण्यात आले आणि परत हायवेवर गाड्यांची रहदारी सुरळीत करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here