लोहारा :- भाजपा दिव्यांग आघाडीचे परंडा तालुका अध्यक्ष, आंदोरा-आंदोरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक महादेव बारसकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी आंदोरी येथे बारसकर कुटुंबियांची सांतवनपर भेट घेतली. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चा धाराशिव जिल्हा माजी उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, आंदोरा-आंदोरी चे मा.सरपंच व भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण शिंदे, समरजीतसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.