निसर्ग प्रेमी ग्रुप उमरगा मार्फत डाळिंब येथे वृक्षारोपण 

0
90

उमरगा :- शहरातील निसर्ग प्रेमी ग्रुपच्या वतीने उमरगा तालुक्यातील दाळींब येथे दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने  सकाळी 7 वाजता ज्ञानदीप विद्यालय येथे ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित राहून वृक्षारोपण केले.या प्रसंगी ग्रुप चे अध्यक्ष सचिन माशाळकर, सदस्य राहुल शिंदे,श्रीकांत भोसले,रवी अंकलकोटे,महेश कवठे,डॉ.मोरे,डॉ.तानाजी दुधभाते,डॉ.सातपुते सर,ॲड. अरुण सूर्यवंशी, राजू पाटील,गणेश माने,सचिन खमीतकर,संतोष राठोड, परमेश्वर हेबळे,अजित अंबुलंगे,वैभव जाधव, संदीप पांचाळ,अशोक पाटील, विद्यालयाचे प्राचार्य गुंजोटे , शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते . वृक्षारोपण नंतर शिवजयंती साजरा करून कार्यक्रमाची सांगता झाली , या वेळी शाळेच्या विध्यार्थ्यानी शिवमहिमा पर गीतांचे नयनरम्य सादरीकरण, पोवाडा, शिव गर्जना, भाषण अश्या विविध उपक्रमाने आजचा हा मंगल दिन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here