पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा

0
146

 

 

धाराशिव :-  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दि. २०  रोजी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीची सहकुटुंब अभिषेक महापूजा करून देवीचा आशीर्वाद घेतला.पालकमंत्री .सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर असून,या दौऱ्यादरम्यान त्यांनी मंदिराच्या विविध विकासकामांची पाहणी केली.अभिषेक महापूजेनंतर पालकमंत्र्यांनी मंदिर परिसर आणि सध्या सुरू असलेल्या विकास आराखड्याच्या कामांचा आढावा घेतला.तसेच,मंदिर पुजाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या.यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव व पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक श्रीमती जया वाहने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here