लोहारा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान शिविर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगा येथील कर्मचारी विजय केवडकर, अजय रोडगे, राहुल कांबळे यांनी रक्ताचे संकलन केले. सर्व प्रथम माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास माळी व सचिन पवार यांनी रक्तदान केले. यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष योगेश गरड, उपाध्यक्ष रोहन खराडे, कोषाध्यक्ष प्रविण कदम, सचिन जाधव, अमोल जाधव, बाबा सातपुते, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास माळी, शरद पवार गट राष्टवादी कॉग्रेस युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, यांच्यासह नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.