दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन नागपुरात

0
54

लोहारा:-  “अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद”, सोलापूर तर्फे आयोजित दहावे आखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन १९ आणि २० एप्रिल २०२५ ला नागपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष डॉ अजीज नदाफ , सचिव अय्यूब नल्लामंदू व संयोजक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा .जावेद पाशा कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केले आहे .संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड , स्मरणिका प्रकाशन व इतर कामे व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी लवकरच एक मिटींग घेण्याचे ठरले आहे. हे संमेलन अखिल भारतीय स्तरावर संपन्न व्हावे, यासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद यांच्या मुख्य आयोजकां सह भारतीय मुस्लीम परिषद, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, छवी पब्लिकेशन्स, हिंदी साहित्य परिषद या सर्वांच्या सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे .हे संमेलन व्यवस्थित पार पाडवे म्हणून नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद सर्व साहित्यिकांशी संपर्क साधत आहे. या अगोदर प्रा.जावेद पाशा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे साहित्य संमेलन अजीज नदाफ सरंच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे १९९२ साली संपन्न झाले होते. आता नागपुरला पुन्हा दहावे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. कृपया या संमेलनासाठी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावे. मुख्यसंयोजक, प्रा.जावेद पाशा कुरेशी, नागपूर – 8459563489 /9422154223,डॉ.इ जा .तांबोळी ,उपाध्यक्ष .,9890919118,अय्यूब अ .लतीफ नल्लामंदू सचिव 9766819981,हसीब नदाफ खजीनदार 93266264088

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here