लोहारा :- पोलिस ठाण्याचे पो.नि.अजित चिंतळे यांची धाराशिव येथे बदली झाल्यामुळे व लोहारा पोलिस ठाण्यात नुतन स.पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे रुजु झाल्याबद्दल यांचा शिवसेनेच्या वतीने दि.22 रोजी यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सहदेव गोरे, सचिन करे, पो.उपनिरीक्षक विनोद जोकार, पो. उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलिस कर्मचारी निरंजन माळी, आकाश भोसले, अर्जुन तिगाडे, माधव कोळे, कांतु राठोड, हनमंत पापुलवार, अदि उपस्थित होते.