महेबूब पठाण
उमरगा :- येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्ता हस्तांतरण प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी येणाऱ्या मालमत्ता धारकांकडून विविध कारणाचे प्रशासकीय अडथळे दाखवून दलाला मार्फत अधिकारी भरमसाठ आर्थिक लूट करत असल्याची चर्चा परीसरात दस्तनोंदणी करीता येणाऱ्या मालमत्ताधारकात सुरु असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील साधारण 96 गावे व उमरगा शहरातील जंगम मालमत्ता असो की,स्थावर मालमत्ता याचे एका व्यक्तीच्या नावावरून दुसर्या व्यक्तीच्या नावाने हस्तांतरण करावयाचे असल्यास उमरगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा दरवाजा खटखटावा लागतो, दरवाजा उघडल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे दस्तनोंदणीचे काम होणे गैरचं.ग्रामीण भागातील मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन प्रमाणे दर ठरल्या नंतर दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत दस्तनोंदणीची प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी ग्रामीण भागाकरीता 5 टक्के मुद्रांक शुल्क व 1 टक्का नोंदणी शुल्क याप्रमाणे पैसे घेणे आवश्यक असते तसेच शहरी भागाकरीता 6 टक्के मुद्रांक शुल्क व 1 टक्का नोंदणी शुल्क याप्रमाणे एकूण 7 टक्के शुल्क आकारणे बंधनकारक असताना संबंधित कार्यालय हे 6 टक्के , 7 टक्के सोडून ,साहेबाचे चार्जेस म्हणून 5000/- रुपये पासून अमर्यादित रक्कम घेण्यात येते, दस्त तयार करण्यासाठी म्हणून 3000/- पासून पुढे आकडा सुरु होतो. म्हणजे उदाहरणार्थ :- साधारण 2 एकर जमीनीचा व्यवहार असेल आणि त्याची 10 लाख रुपये किंमत होत असल्यास शासकीय नियमानुसार 60 हजार रुपये शुल्क आकारणे आपेक्षीत असताना दस्त नोंद करण्याकरीता विविध प्रकार चे अडथळे दाखवून 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत दोन एकर ची दस्त नोंदणीकरण्या करीता रक्कम घेतली जाते. ही सर्वसाधारण दस्तनोंदणीकरीता आर्थिक लुट ही दररोज होत असल्याचे सरसकट उदाहरण आहेत. यापेक्षाही जास्त प्रमाणात लुट करण्यात येते त्याची सविस्तर चर्चा आम्ही आपल्या सोबत पुढील अंकात करणार आहोत.
भाग क्रमांक 2
फुल शेतीच्या आर्थिक सुबत्तेने उमरगा दुय्यम निबंधक कार्यालय बहरले
एखाद्या मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या किंमतीच्या ग्रामीण भागाकरिता 6% स्टँप ड्युटी+ रजिस्ट्रेशन फीस असे चार्जेस आहेत. व शहरी भागाकरीता 7% स्टँप ड्युटी+ रजिस्ट्रेशन फीस असे चार्जेस आहेत.दस्त हाताळनी शुल्क (DHC) प्रती पान 20/- रुपये असते साधारण 500 ते 1000/- रुपये होतात. मुद्रांक विक्रेता (दलाल) यांची फीस 2500 ते 3000/- इतकी असते. याव्यतिरिक्त दलाला मार्फत प्रत्येक दस्तनोंदणीकरीता 5 ते 10 हजार रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. हे कशा करीता व कोणाकरीता घेतले जात आहेत. या माध्यमातून गरीब गरजू मालमत्ता धारकांची लुट करीत असल्याची चर्चा सुरु आहे.
प्रॉपर्टी/मालमत्ता ट्रान्सफर कशी करायची
तुम्ही तुमची प्रॉपर्टी दुसरी व्यक्तीकडे विशेषतः घरातील सदस्याकडे हस्तांतरित करण्याचे मार्ग शोधात असाल तर कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. सेल डीड, गिफ्ट डीड आणि त्यागपत्र. पण या तिन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय तुम्ही असाच निवडू शकत नाही कारण प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. म्हणूनच भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी वरील पैकी एक पर्याय निवडला पाहिजे.