उमरगा शहरात चर्मकार समाजासाठी ४० लक्ष रू निधी संत रविदास महाराज सांस्कृतीक सभागृहाचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न

0
198

 

उमरगा    :-  शहरातील लक्ष्मी नगर, येथील चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराज सांस्कृतीक सभागृह बांधकामासाठी शिवसेनेचे उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडुन ४० लक्ष रू. निधी उपलब्ध करून दिला होता. या सभागृहाचे काम पुर्ण झाल्याने दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेनेचे उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याठिकाणच्या उर्वरीत कामासाठी आगामी काळात महायुती शासनाच्या माध्यमातुन आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांनी आश्वासीत केले. या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख म्हणुन जेष्ठ शिवसेना नेते जितेंद्र शिंदे, युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड, उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, चंद्रशेखर सुर्यवंशी, माकणीकर गुरूजी, मधुकर बिद्री, किसन दामावले, ॲड.राजेंद्र गंगणे, सदाशिव भातागळीकर, कॉन्ट्रॅक्टर विजय काळे, अरूण जगताप, मनोज जाधव, संदीप चौगुले, शरद इंगळे, व्यंकट कोराळकर, पंडीत खंडाळकर, डॉ.फरीद अत्तार, प्रदीप मदने सर, पत्रकार सचिन बिद्री, शिवाजी वाकळे, राजेंद्र सुर्यवंशी, कृष्णा हिराळे, विठठल वाकळे, कपील दामावले, स्वप्नील दामावले, गणेश पारधे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास तालुक्यातील चर्मकार समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here