लोहारा :- शिवसेना मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेना सदस्य नोंदणी अभियान धाराशिव व लातूर जिल्हा संपर्कनेते पदी शिवसेनेचे उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह, लातूर येथे लातूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख आदी पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले मार्गदर्शन सांगितले कि, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत प्रमाणात करुन घ्यावे, असे सांगितले. सदस्य नोंदणी अभियान धाराशिव व लातूर जिल्हा संपर्कनेते पदी शिवसेनेचे उपनेते माजी
आ.ज्ञानराज चौगुले यांची निवड झाल्याबद्दल यांचा लातुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या बैठकीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर औताडे व कोंडीराम काळे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने (औसा, निलंगा), गोपाळराव माने (उदगीर, अहमदपूर), सचिन दाणे (लातूर शहर, ग्रामीण), OBC/VJANT जिल्हाप्रमुख विशाल देवकते, उप जिल्हाप्रमुख अजय भोळे, लातूर शहर माजी तालुका प्रमुख बाबुराव शेळके, लातूर तालुका प्रमुख राजकुमार सुरवसे, औसा तालुका प्रमुख तानाजीराव सूरवसे, लातूर तालुका प्रमुख सदाशिव गव्हाणे, शिरूर अनंतपाळ विकास शिंदे, धनराज बिराजदार देवणी, भगवान जाधव निलंगा, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.