मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा

0
64

 

लोहारा :-  विद्यार्थी दशेपासूनच सुजितसिंह ठाकूर यांनी संघाच्या विचारांची शिदोरी घेऊन समाजसेवेचा प्रण केला. मिळेल ती जबाबदारीला न्याय देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न केला. लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत काम करत त्यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आत्मसात केले. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे, माजी मंत्री आमदार विजयकुमार (मालक) देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, खंडेराव चोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब निंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पानपुडे, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्पसंख्यांक मोर्चा जहीर चौधरी, बाबासाहेब जाधव, सुखदेव टोंपे, शहराध्यक्ष युवा मोर्चा अविनाश विधाते तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here