दहा मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 

0
318

धाराशिव:- येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड करणे व पाहिजे असलेले फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आबा उर्फ अशोक अर्जुन पवार, रा. उमरा ता. कळंब जि. धाराशिव याने धाराशिव जिल्हृयातील व बाहेर जिल्हृयातील बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणलेल्या असुन  तो सध्या कळंब येथे आहे व त्याचे कडे एक चोरीची मोटारसायकल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे कडे असलेल्या मोटरसायकली बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने बीड येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतले.त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा चुलता गोविंद व्यंकट पवार याचे सोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणल्या असुन उमरा येथे घरी एक मोटरसायकल आहे व इतर मोटरसायकल या घराचे जवळील तळ्याचे पाळी चे बाजूला झाडाझुडपात लपवून ठेवल्या आहेत असे सागिंतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 1) 47/2025  भा.दं.वि.सं. कलम 303(2), 2)125/2024 कलम 379 भा.दं.वि.सं,  कळंब 3) गुरनं 367/2024 कलम 379 भा.दं.वि.सं.,पो स्टे तुळजापूर 4) गुरनं 13/2025 भा.दं.वि.सं. कलम 303(2), पोस्टे शिवाजीनगर जि. बीड गुरनं154/2021 कलम 379, पोस्टे गेवराई जि. बीड गुरनं 555/2024 303(2), पोस्टे मोहळ जि. सोलापूर गुरनं186/2024 कलम 379 भा.दं.वि.सं, पोस्टे विमानतळ एअरपोर्ट जि.पुणे शहर गुरनं 34/2025 कलम 303(2) भा.न्या.सं, पोस्टे सिंहगड रोड जि.पुणे शहर गुरनं 254/2024 कलम 379  भा.दं.वि.सं, पोस्टे स्वारगेट जि.पुणे शहर गुरनं 283/2024 कलम 379 भा.दं.वि.सं,प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष आरोपी नामे- आबा उर्फ अशोक अर्जुन पवार, वय 30 वर्षे, रा. उमरा ता. कळंब जि. धाराशिव याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 10 मोटरसायकल एकुण 3,00,000 ₹ किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव , अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव पोह/530 निबांळकर, पोह/1003 वाघमारे,पोना/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे,पोअं/662 गुरव यांच्या पथकाने केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here