हिप्परगा रवा येथे जे.एस.डब्ल्यू. एनर्जी व जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर 

0
24

 

लोहारा :- तालुक्यातील हिप्परगा रवा ग्रामपंचायत कार्यालयात दि.24  रोजी जे.एस.डब्ल्यू. एनर्जी आणि जे.एस.डब्ल्यू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये जे.एस.डब्ल्यू. संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 159 पेक्षा अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन मोफत उपचार केले. सदर शिबिरामध्ये ग्रामस्थांनी मोफत बीपी, शुगर तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, नेत्र तपासणीद्वारे गरजू ग्रामस्थांना मोफत चष्मे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मोफत औषधोपचार इ. सेवांचा लाभ घेतला. यामध्ये सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तज्ञ महिला डॉक्टरांनी माध्यमिक शाळेतील किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच विजय लोमटे, ग्रामविकास अधिकारी मुंढे, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या सेवा आणि उपचारांबाबत समाधान व्यक्त केले. उपसरपंच विजय लोमटे यांनी आयोजनात विशेष पुढाकार घेतला होता. यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here