उमरगा :- तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, येथे दि. 25 रोजी तालुका विधी समिती, उमरगा व विधीज्ञ मंडळ, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. माने होते. तसेच पी. बी. रेमणे (दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश वरिष्ठ स्तर), सौ.जी. पी. बनकर (न्यायाधीश, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर), श्रीमती एम. पी. मथुरे (न्यायाधीश, 3रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), ॲड. एम. पी. कोथिंबरे (अध्यक्ष, विधीज्ञ मंडळ, उमरगा),ॲड. एस. एम. देशपांडे (सहाय्यक सरकारी वकील), सौ.एस.के. घोडके (सहाय्यक सरकारी वकील), ॲड.एस.पी. इनामदार (विधीज्ञ, विधीज्ञ मंडळ, उमरगा), संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ.जी. पी. बनकर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याविषयी अधिक मार्गदर्शन केले. पोक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२. हा कायदा बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्यावरील होणारे आत्याचार, कायदे व होणारी शिक्षा याबद्दल माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात गुन्हेगारी घटनांमध्ये पीडितांना भरपाई देण्यासाठी विविध योजना आहेत. महाराष्ट्र पीडित नुकसान भरपाई योजना, महाराष्ट्र महिला पीडित नुकसान भरपाई योजना अशा योजना पीडितांना भरपाई देण्यासाठी देशातील सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारशी चर्चा करून योजना तयार करतात. या योजनेतून गुन्हेगारी घटनांमध्ये जखमी किंवा नुकसान झालेल्या पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना भरपाई दिली जाते. विद्यार्थ्यांना विधी प्राधिकरण अंतर्गत स्वयंसेवक म्हणून कार्य करावे व गरजूना न्याय मिळण्यासाठी मदत होईल. कायदा अथांग असून कितीही मोठा कायदेतज्ञ हा कायद्याचा विद्यार्थी असतो असे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. माने म्हणाले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अभिजित पाटील, प्रा.आविनाश चौधरी, प्रा.शहाबाज शेख, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. ॲड.एस.पी. इनामदार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्राचार्य महेश कदारे यांनी मानले.


