कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना , अर्जाची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी

0
120

 

 

धाराशिव,:-  खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची प्रति हेक्टर (कमाल २ हेक्टरपर्यंत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.या योजनेसाठी पात्रतेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहे.ज्यांनी ई-पिक पाहणी केलेली नाही,पण ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद आहे. वनपट्टेधारक,वैयक्तिक व सामाईक खातेदार शेतकरी यांनी आपले नाव www.scagridbt.mahait.org पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यकांकडून तपासून घ्यावे. वैयक्तिक खातेदार,आधार संमती सामाईक खातेदार,आधार संमती,ना हरकत प्रमाणपत्र ही कागदपत्रे २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित कृषि सहाय्यकांकडे सादर करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी किंवा कृषि सहाय्यकांशी संपर्क साधावा.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here