औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामुळे किल्लारी चे नशीब उजळले ; अपर तहसीलदार कार्यालय इमारत बांधकाम व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 28 कोटी मंजूर 

0
143

 

लोहारा :- निवडणुकीपूर्वी किल्लारी येथे पदनिर्मितीसह स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापित करण्यास आ. अभिमन्यु पवार यांनी मंजुरी मिळवून घेतली होती. किल्लारीचा तालुक्याच्या ठिकाणांप्रमाणे विकास करण्यास सुरुवात झाली असून किल्लारी येथे अपर तहसीलदार कार्यालय इमारत बांधकाम करण्यासाठी 13 कोटी 50 लक्ष रु. तसेच किल्लारी येथे अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थान बांधकाम करण्यासाठी 14 कोटी 48 लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती औसा मतदार संघाचे आ. अभिमन्यु पवार यांनी दिली. यामध्ये प्रकार 1 ची 4 निवासस्थाने, प्रकार 2 ची 17 निवासस्थाने, प्रकार 3 ची 5 निवासस्थाने आणि प्रकार 4 चे 1 निवासस्थान अशा एकूण 27 निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 1993 च्या भूकंपानंतर किल्लारीला तालुका करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, श्री निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर 30 वर्षांपूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेला शब्द पूर्णत्वास नेऊ शकत आहे. याचे मनस्वी समाधान आहे. राज्याचे विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्यतत्पर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व लातूरचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आ. अभिमन्यु पवार यांनी मनः पूर्वक आभार मानले आहे. किल्लारीच्या वैभवशाली विकासाच्या द्वितीय अध्यायास प्रारंभ झाला असून नव्या अपर तहसीलदार कार्यालय इमारतीतून लोकांना गुड गव्हर्नन्सची अनुभूती येईल असा विश्वास आ. अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला.

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here