पेठसांगवी येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी 

0
94

 

 

 

उमरगा :- तालुक्यातील पेठसांगवी येथील संत रोहिदास नगर मध्ये श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती दि.26 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठसांगवी गावच्या सरपंच सुमन सुभेदार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या मराठवाडा युवा निरीक्षक आकांक्षा चौगुले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखाने ,चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष अँड गणपती कांबळे ,नारंगवाडी गावचे सरपंच शेखर घंटे,चर्मकार संघाचे तालुका अध्यक्ष आकाश राजे कांबळे,सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ भोसले,माजी पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, न्युज सिक्सरचे संपादक सोमनाथ बनसोडे यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रतिमेचे पूजन व आरती आकांक्षा चौगुले,नितिन बप्पा शेरखाने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चर्मकार समाजातील लहान मुलं-मुली यांनी प्र थोर महापुरुषांची भाषणे केली .कार्यक्रमाला पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, संजय माळी,माजी उपसरपंच प्रकाश सुभेदार अमर यमगर, निर्मला देशमुख , नागणाथ यमगर ,शालेय समिती अध्यक्ष संतोष पाटील, अहमद तांबोळी, राजेंद्र पाटील,करण बाबळसुरे, धनराज सुभेदार ,व्यंकट गव्हाळे,पत्रकार उमेश सुरवसे ,धोंडीराम वाघमारे,ताहेर शेख,सावंत साहेब, निळकंठ राठोड, गिरमल दलाल,दत्तू राऊत ,यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परमेश्वर कांबळे, रघुनाथ कांबळे,ज्योतिबा कांबळे ,बालाजी कांबळे ,संतोष कांबळे,श्याम कांबळे,आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन ऐश्वर्या कांबळे यांनी केले तर आभार पोलीस पाटील ईश्वर सुरवसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here