महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढतीत वडगाववाडीच्या जीवन भुजबळ यांची बाजी 

0
57

 

लोहारा :-  शहरात दि.27 फेब्रुवारी रोजी आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत वडगाववाडीच्या जीवन भुजबळ याने बाजी मारत 35 तोळे चांदीची महादेव पिंड मिळविले. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दि.27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील लोहारा हायस्कूल मैदानावर खुल्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन बाजार समितीचे संचालक शंकर जट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, गोपाळ सुतार, विरेश स्वामी, ओम पाटील, सतीश ढगे, महेश कुंभार, नगरसेवक जालिंदर कोकणे, भिमाशंकर डोकले, पप्पू स्वामी, उमेश भरारे, अदि, उपस्थित होते. पाच हजारांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. 35 तोळे चांदीची महादेव पिंडीच्या पारितोषिकासाठी हासेगाववाडी (ता.औसा) येथील तुकाराम मानवर, वडगाववाडी (ता. लोहारा) येथील जीवन भुजबळ यांच्यात कुस्तीचा सामना झाला. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने रंगत वाढली. यात भुजबळ याने तुकाराम मानवर याला हरवून 35 तोळे चांदीची महादेव पिंड मिळवली. पंच म्हणून पैलवान रामेश्वर कार्ले, अप्पास माळी, दयानंद साळुंके, अरीफ देशमुख, गणेश कस्तुरे, महेश कुभार, गोविंदा घाडगे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here