रेखकला परीक्षेत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

0
79

 

लोहारा:-   दि.12 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य कला व शिक्षण विभाग मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रेखकला एलिमेंटरी व इंटरमिजिऐट परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये इयत्ता 7 वी वर्गातील मनस्वी देवराव देवकर – A ग्रेड, गुंनेवार नाही राजेश – A ग्रेड ,स्वामी सुप्रिया दत्तात्रय – B, देवकर अदिती दिगंबर -B ग्रेड, ग्रेड, वर्षा अनिल चव्हाण – B ग्रेड, तसेच इयत्ता 6 वी तील धवन गौरी विठ्ठल -A ग्रेड, लोखंडे संस्कृती अभिजित – A ग्रेड मिळवून यश प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल स्कुलचे अध्यक्ष डॉ.सुहास भोसले, संचालिका सौ सविता जाधव, मार्गदर्शक शिक्षक व्यंकटेश पोतदार, प्रा.यशवंत चंदनशिवे, सिद्धेश्वर सुरवसे, सोनाली काटे यांच्यासह पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here