लोहारा येथील बटालियन करियर अकॅडमीचे 41 विद्यार्थी विविध दलात भरती ; माजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार 

0
427

 

लोहारा  :-  येथील बटालियन करियर अकॅडमीचे 41 विद्यार्थी पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल व अग्नी शामक दलात भरती झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोहारा शहरातील कन्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि. 1 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बटालियन करियर अकॅडमीचे अध्यक्ष प्रदीप पोंदे हे होते. यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, सुरेश वाघ, लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहन चव्हाण (मुंबई पोलीस), अनिकेत पवार (मुंबई पोलीस), प्रिया मोहिते (मुंबई पोलीस), अल्ताफ औरादे (मुंबई पोलीस), गोविंद बनसोडे (ठाणे पोलीस), सुनिल धानुरे( पुणे पोलीस), समिर शेख (अग्नीशामक दल), गोविंद डोकडे (जळगाव पोलीस), अक्षय जाधव (महाराष्ट्र सुरक्षा बल), यांच्यासह 41 विद्यार्थी पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल व अग्नी शामक दलात भरती झाले आहेत. त्यांचा शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे विद्यार्थी येवू शकले नाहीत त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची लोहारा शहरातून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आ.ज्ञानराज चौगुले, सुरेश वाघ, पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षक कृष्णात चव्हाण, भैरवनाथ दरेकर, बाळकृष्ण उंबरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुक्तेश्वर चव्हाण यांनी केले. तक्ष आभार तानाजी माटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here