लोहारा :- भूमी अभिलेख व जलसंधारण विभाग यांनी मोजणी करून जवळपास महिना होत आला परंतु भूमी अभिलेख विभागाने अद्यापही मोजणी अहवाल (जॉईंट मेजरमेंट शीट) जलसंधारण विभागास सादर केला नाही. त्याबद्दल लोहारा तालुक्यातील वडगांववाडी ग्रामस्थांनी नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांची दि.3 मार्च रोजी भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागास संपर्क करून तात्काळ काम चालू करण्याचे निर्देश दिले. तसेच गावकऱ्यांनी परत एकदा उपोषणाचा इशारा दिला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, माजी जि.प.सदस्य गुंडू अण्णा भुजबळ, उपसरपंच अंकुश भुजबळ, संगप्पा बादूले सर, प्रशांत गिराम, निकेश बचाटे, आदी उपस्थित होते.